सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पंडित पगारे यांची पोलीस महासंचालक पदकासाठी निवड
By नम्रता फडणीस | Published: April 30, 2024 05:38 PM2024-04-30T17:38:56+5:302024-04-30T17:39:27+5:30
मूळच्या जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात राहणारे सुनील पगारे हे अतिशय खडतर प्रवास करून पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले आहेत...
पुणे : गेली 34 वर्ष पोलीस सेवेत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पंडित पगारे यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांची पोलीस महासंचालक पदकासाठी निवड करण्यात आली आहे.
मूळच्या जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात राहणारे सुनील पगारे हे अतिशय खडतर प्रवास करून पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी आपल्या पोलीस दलाची सुरुवात ठाणे शहरातून केली. धुळे जिल्हयात आझादनगर , साक्री , धुळे तालुका, विशेष शाखा, पासपोर्ट , ईमिग्रेशन , गुन्हे अन्वेषण,अँटीकरप्शन अशा अनेक ठिकाणी विविध व गुणात्मक गुन्हे चे तपास करुन 2014 मध्ये पुणे शहर पोलीस दलात ते रुजू झाले.
पुण्यामध्ये सिंहगड रोड, दत्तवाडी, सहायक पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3 कार्यालय कोथरूड, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी, हडपसर, आणि त्यानंतर गुन्हे शाखा पुणे आशा ठिकाणी विविध अतिशय उत्तम पध्दतीने त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक पदक साठी त्यांची निवड करण्यात आली.