मांजरी महाविद्यालयातील सन्मती कुरकुटेची अभियांत्रिकी सेवा परीक्षेत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:31+5:302021-04-17T04:10:31+5:30

परभणी हे सन्मतीचे मुळगाव असून त्याचे कुटुंब पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बाल विद्यामंदिर, परभणी या ठिकाणी ...

Selection of Sanmati Kurkute from Manjari College in Engineering Service Examination | मांजरी महाविद्यालयातील सन्मती कुरकुटेची अभियांत्रिकी सेवा परीक्षेत निवड

मांजरी महाविद्यालयातील सन्मती कुरकुटेची अभियांत्रिकी सेवा परीक्षेत निवड

Next

परभणी हे सन्मतीचे मुळगाव असून त्याचे कुटुंब पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बाल विद्यामंदिर, परभणी या ठिकाणी झाले.

दहावीनंतर पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्याने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. बारावीनंतर त्याने हडपसर येथील नामांकित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विद्याशाखेतून विशेष प्रवीण्यासह पदवी संपादन केलेली आहे. त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि या परीक्षेत द्वितीय क्रमांक संपादन केला.

सन्मतीने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कार्यकुशल अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मण पवार, सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव, प्राचार्य डॉ. रितेश पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.

Web Title: Selection of Sanmati Kurkute from Manjari College in Engineering Service Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.