शिष्यवृत्तीसाठी सूर्यवंशी, गुडीबंडे, घमंडे, घोरपडे अन् मेस्रींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:08 AM2021-04-05T04:08:59+5:302021-04-05T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेचा वारसा पुढे चालू राहावा, आश्वासक युवा कलावंतांना कलोपासनेसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेचा वारसा पुढे चालू राहावा, आश्वासक युवा कलावंतांना कलोपासनेसाठी प्रोत्साहन मिळत राहावे, या उद्देशाने उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टतर्फे तालतपस्वी कै. पं. मधुकर कोठारे (लंडन) स्मृती संगीत शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. यंदाच्या (२०२१-२२) शिष्यवृत्तीसाठी ओंकार सूर्यवंशी, गोपाळ गुडीबंडे (तबला), ऋचा घमंडे (कथक), ईश्वर घोरपडे (शास्त्रीय गायन), विश्वजीत मेस्री (शास्त्रीय गायन) यांची निवड केली आहे.
भारतीय अभिजात कला आणि संस्कृती संवर्धनासाठी मुंबई, पुणे, ठाणे येथे गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ सजगपणे कार्य करणाऱ्या उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे संगीत शिष्यवृत्ती दिली जाते. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि तबलावादन कलांमध्ये, गुरुकुल पद्धतीने सातत्याने विद्यादान करणाऱ्या ज्येष्ठ गुरूंच्या शिफारसींद्वारे, त्यांच्या पसंतीस प्राप्त ठरणाऱ्या युवा आणि गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येकी वीस हजार रुपये आणि प्रमाणपत्र या स्वरूपात ही शिष्यवृत्ती दिली जाते.
ग्वाल्हेर आणि आग्रा घराणा गायकीचे अध्वर्यू, रचनाकार आणि ज्येष्ठ संगीततज्ज्ञ कै. वि. रा. आठवले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, शास्त्रीय संगीत गायनासाठी विशेष प्रावीण्य युवा पुरस्कार अहमदनगरच्या गायत्री शिंदे हिला जाहीर झाला आहे.
फोटो -
१) ओंकार सूर्यवंशी
२) गोपाळ गुडीबंडे
३) ऋचा घमंडे
४) ईश्वर घोरपडे
५) विश्वजित मेस्री
६) गायत्री शिंदे