अनुदानासाठीच बचत गट

By admin | Published: January 2, 2015 01:13 AM2015-01-02T01:13:12+5:302015-01-02T01:13:12+5:30

शहरातील बचत गट हे व्यवसाय करण्यासाठी खोलले जातात की, अनुदान मिळवण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. विशेषकरून शहरात कोणत्याही बचत गटाचे व्यवसायात ठोस असे पाऊल दिसून येत नाही.

Self Help Groups for Grants | अनुदानासाठीच बचत गट

अनुदानासाठीच बचत गट

Next

सुवर्णा नवले ल्ल पिंपरी
शहरातील बचत गट हे व्यवसाय करण्यासाठी खोलले जातात की, अनुदान मिळवण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. विशेषकरून शहरात कोणत्याही बचत गटाचे व्यवसायात ठोस असे पाऊल दिसून येत नाही. शहरातील बचत गट अनुदान घेऊन थंडावलेले दिसून येत आहेत. बचत गटांवर राजकीय वरदहस्त असल्याचे दिसून येते. बचत गट हे राजकीय स्वार्थासाठी वापर होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. बचत गटाची दवंडी पिटणारे, महिलांचे सबलीकरण करणारे बचत गटाच्या मुख्य उद्देशापासून वंचित असल्याचे दिसते.
शहरात एकूण महापालिकेकडे नोंदणीकृत बचत गट ३३६८ आहेत. हे बचत गट अनुदानप्राप्त आहेत. महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या वतीने अनुदान देण्याचे काम केले जाते. शहरात २००१ पासून महिला बचत गट सुरू झाले आहेत. बचत गटांना सुरूवातीला अनुदान चेकच्या स्वरूपात मिळत होते . आता ईसीएस प्रणालीद्वारे महिलांना बचतीचे अनुदान मिळू लागले आहे. बँकेच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. बचत गटाची सुरूवात होऊन आतापर्यंत १५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या १५ वर्षांच्या कालावधीमध्ये शहरात महिलांनी बचत गटांतून मिळणाऱ्या अनुदानाच्या माध्यमातून किती महिलांनी उद्योग सुरू केले व किती महिलांनी मिळालेल्या अनुदानातून पैसे व्याज स्वरूपात अथवा आर्थिक अडचणीकरीता वापरले आहेत. याचा कोणताही पाठपुरावा महापालिकेकडे उपलब्ध नाही.
बचत गटातील महिलांचा उपयोग राजकीय व्यक्ति निवडणूकांच्या काळात करून घेताना दिसून येते. प्रचार अथवा मतदानासाठी बचत गटांतील महिलांना कामे दिली जातात. मात्र याचा फायदा राजकीय व्यक्तींना मिळतो. सर्वसामान्य घटक यांपासून वंचित राहतो. बचत गटातील महिला समूहाने व्यवसाय करण्यासाठी एकत्रित येतात व बचत गटातील महिलांना अनुदान मिळवून व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्याचा कांगावा केला जातो. मात्र बचत गट चालवणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी प्रशिक्षण मिळत नाही. अनुदान मिळवून दिले की, महापालिकेचे काम संपले आणि अनुदान प्राप्त झाले की, महिलांचा हेतू संपला. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नेतेमंडळीनी केवढे उंचावर नेऊन ठेवले आहे अथवा सक्षम केले आहे हे दाखवण्याचा साजेसा प्रयत्न केला जातो. बचतीचा हेतूच दुर्लक्षित झाला. महापालिकेने बचत गटाना आतापर्यंत ६ कोटींहून अधिक अनुदान उपलब्ध करून दिले आहे. मात्र बचत गटाच्या माध्यमातून फक्त व्यवसायाचे स्वरूप न येता कर्जाच्या स्वरूपातच ही रक्कम अधिक वापरण्यात आली आहे. महिलांना व्याजदर २ टक्के दराने मिळत आहे. यामुळे व्याजाने पैसे घेऊन वापरणे व देणे याव्यतिरिक्त या पैशांचा कोणताही वापर झालेला दिसून येत नाही. दर वर्षी बचत गटांसाठी अनुदान उपलब्ध करणे व वाटप करणे एवढेच काम पालिकेला असल्याचे दिसून येत आहे.

वर्षअनुदान खर्च
प्राप्त गट
२००१-०२२९६ लाख ८० हजार ८००
२००२-०३८६७ लाख ९ हजार
२००३-०४९२१ लाख ७१ हजार ७००
२००४-०५१४६२५ लाख ९२ हजार
२००५-०६१३११८ लाख ३ हजार
२००६-०७४३६८१ लाख १ हजार
२००७-०८११२५२ क ोटी २ लाख ५० हजार
२००८-०९८२२१ कोटी ४९ लाख ६९ हजार ३५२
२०११-१२१८९३३ लाख १५ हजार
२०१३-१४३५२६० लाख ४० हजार

बचत गटांना अनुदान वेळोवेळी उपलब्ध करून दिले जाते. बचत गटांना अर्थसहाय्यचा उपयोग कोणत्याही आर्थिक कारणासाठी वापर केला जातो. या माध्यमातून महिला स्वत:च्या खर्चासाठी या पैशाचा वापर करू शकतात. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. बचत गटांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे.
- संभाजी ऐवले, समाज विकास अधिकारी

Web Title: Self Help Groups for Grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.