आत्मनिर्भर भारतासाठी हवे आर्थिक स्थैर्य : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:57+5:302021-02-17T04:16:57+5:30
अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या ...
अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी 'आत्मनिर्भर भारत ; वास्तव, संधी आणि आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. एस. जी. शिंदे बोलत होते. समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे होते. या वेळी व्यासपीठावर विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. बी. निकुंभ, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य भाऊसाहेब सांगळे, परिषदेच्या समन्वयक व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सीमा चव्हाण आदी उपस्थित होते.
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ.सुरजित दास ( जे.एन.यु. दिल्ली ), प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी ( आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बोदवड ) , डॉ. संजय वैद्य (आरबीएनबी कॉलेज, श्रीरामपूर ) , डॉ. दिनेश शर्मा( एस.डी.जे. गर्ल्स कॉलेज, दिमापूर - नागालँड ) , डॉ. आर. जी. रसल ( पद्मश्री विखे पाटील कॉलेज, लोणी ) , डॉ. अविनाश निकम ( आर्ट्स , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, शहादा)या तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. या परिषदेसाठी ६६ संशोधन पेपर प्राप्त झाले असून विविध भागातील ७० प्राध्यापक आणि ९६ विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ.के.जी. कानडे म्हणाले, 'आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ देशांतर्गत लोकसंख्येचे पालनपोषण योग्य पद्धतीने करण्यासाठी देशांतर्गत संसाधनाचा पुरेपूर वापर करून घेणे, असा आहे. यामध्ये परदेशी सहाय्य नको ही भूमिका नसून सरसकट परदेशी मालावर अवलंबित्व नको ही भूमिका आहे.' राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.हंसराज थोरात (शरदचंद्र पवार आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, दुदळगाव- आळंदी ) व प्राचार्य डॉ. के.जी.कानडे यांच्या उपस्थितीत संशोधन पेपर शीर्षकाच्या हस्तपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.