‘सबका साथ, सबका विकास’मधून आत्मनिर्भर भारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:03+5:302021-09-24T04:12:03+5:30
पुणे :“ कोरोना काळात १०० पेक्षा अधिक देशांना जीवनरक्षक औषधी पाठवून विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाचे कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
पुणे :“ कोरोना काळात १०० पेक्षा अधिक देशांना जीवनरक्षक औषधी पाठवून विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाचे कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा देऊन देशाला मजबूत केले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वानुसार देशातील युवकांना कार्य करावयाचे आहे,” असे मत केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित सहा दिवसीय ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी झारखंडचे राज्यपाल रमेश बायस होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री तारीक अन्वर, खासदार माणिकम तगोरे आणि राज्यसभेचे खासदार तिरूची शिवा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि भारतीय छात्र संसदेचे समन्वयक रवींद्रनाथ पाटील उपस्थित होते.