‘सबका साथ, सबका विकास’मधून आत्मनिर्भर भारत-केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला - ‘भारतीय छात्र संसदे’चे ऑनलाइन उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:45+5:302021-09-24T04:11:45+5:30
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा ...
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी झारखंडचे राज्यपाल रमेश बायस हे होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री तारीक अन्वर, खासदार माणिकम तगोरे आणि राज्यसभेचे खासदार तिरूची शिवा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि भारतीय छात्र संसदेचे समन्वयक रविंद्रनाथ पाटील हे उपस्थित होते.