मतदारांमध्ये सेल्फीची क्रेझ

By admin | Published: February 22, 2017 02:36 AM2017-02-22T02:36:35+5:302017-02-22T02:36:35+5:30

कोणत्याही गोष्टी स्वत:च मार्केटिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे. बहुतांश मतदार मतदानानंतर सेल्फी काढत होते. यामध्ये

Selfie craze of voters | मतदारांमध्ये सेल्फीची क्रेझ

मतदारांमध्ये सेल्फीची क्रेझ

Next

पिंपरी : कोणत्याही गोष्टी स्वत:च मार्केटिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे. बहुतांश मतदार मतदानानंतर सेल्फी काढत होते. यामध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवकांचा आणि युवतींची संख्या अधिक आहे. तसेच मतदान केल्याचे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अपलोड केल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार चुरस असून, मतदार परिवर्तन घडविणार की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात मते टाकणार हेही मतदानावर अवलंबून राहणार आहे. महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचे गेल्या दीड वर्षापासून दिसून येत आहे. त्यामुळे सभाही रंगल्या होत्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुन्हा सत्ता मिळवून हॅट्ट्रिकचे ध्येय समोर ठेवले असून, भाकरी फिरवा, कारभारी बदलाची हाक देत भाजपाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. त्यामुळे परिवर्तन होणार की राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राहणार, अशी चर्चा शहरात आहे. (वार्ताहर

किचकट मतदान पद्धतीमुळे विलंब
 प्रत्येक मतदाराला या वेळी चार मते द्यायची असून, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास तसेच समजण्यास किचकट असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यास जास्त वेळ लागत होता. पिंपरी येथील प्रभाग क्रमांक २१, मतदान केंद्र क्रमांक ६२ येथील मतदानाच्या मशिनमधील बिघाड झाला. त्यामुळे काही काळ मतदान थांबविले होते. संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक २० येथील मतदान केंद्र खूप उंच आहे, मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी डोली किंवा व्हीलचेअरची कोणतीही सोय नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांची मोठी गैरसोय होताना दिसत होती. तर दुसरीकडे मोरवाडी येथील एसएनबीपी शाळेमध्ये मतदारांसाठी रेड कार्पेट टाकले होते. प्रभाग क्रमांक वीसच्या केंद्र क्रमांक १५ मध्ये मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तब्बल अर्धा तास मशीन बंद होते.

Web Title: Selfie craze of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.