फूड पॅकेटद्वारे करा शिवभाेजन थाळीची विक्री : जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 06:49 PM2020-04-01T18:49:05+5:302020-04-01T18:51:10+5:30

लाॅकडाऊनमुळे आता शिवभाेजन थाळी फुडपॅकेटद्वारे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

sell shivbhojan thali by food packet : district collector rsg | फूड पॅकेटद्वारे करा शिवभाेजन थाळीची विक्री : जिल्हाधिकारी

फूड पॅकेटद्वारे करा शिवभाेजन थाळीची विक्री : जिल्हाधिकारी

googlenewsNext

पुणे : सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन  शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी  5 रुपये  या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची कठोरपणे अंमलबजावणी करण्‍याबाबत केंद्रांना आदेश देण्‍यात आलेले आहेत. केंद्रचालकांना फूड पॅकेटव्दारे थाळी विक्री करण्‍यास परवानगी दिली असून गरीब, गरजू व्यक्तींच्या ठिकाणी जाऊन त्यांना थाळी विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, दि. 24 मार्च 2020 पासून कोविड- 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर माहे एप्रिल, मे व जून 2020 या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्य अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजना रेशन कार्ड धारकांना पुरविण्यात येणार आहे. एप्रिल  करिताचे 3868.50 मे. टन गहू व 2548 मे. टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. या  धान्याचे वाटप रेशनकार्डवर दि. 1 एप्रिलपासून सुरू करण्‍यात येत आहे.

झोपडपट्टी भागात धान्य व्दारपोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टयात एकूण 270 दुकानांमधून अन्नधान्य व्दारपोहोच  करण्यात येईल. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक ठरविले असून त्याप्रमाणे धान्य डिलिव्हरी करण्यापूर्वी कार्डधारकांना कळविण्‍यात येईल. कार्डधारकाच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ इ. गोष्टी कार्डधारकांच्या  मागणी व गरजेप्रमाणे विक्री करण्याची मुभा देण्यात  आली असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.

रेशन कार्डधारकांनसाठी हेल्पलाईन

रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

टोल फ्री क्रमांक 1077

मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8.00 ते रात्री 8.00)

मोबाईल क्रमांक  9405163924

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय 11 पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधे यांची सद्यस्थितीत  एकूण 27 हजार 210 दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत.

Web Title: sell shivbhojan thali by food packet : district collector rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.