बनावट कागदपत्रांद्वारे इमारतीची विक्री
By admin | Published: November 18, 2016 04:58 AM2016-11-18T04:58:50+5:302016-11-18T04:58:50+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे रहाटणी, काळेवाडी येथील दुमजली इमारतीची विक्री केल्याचा प्रकार माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमुळे
पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे रहाटणी, काळेवाडी येथील दुमजली इमारतीची विक्री केल्याचा प्रकार माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमुळे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या चार आरोपींविराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्बयात घेतले असून, उर्वरित दोघांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही.
किशोर ज्ञानोबा गायकवाड यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. इमारत खरेदी करणारे दीपक पंडित माकने, तसेच ज्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत विक्रीचा व्यवहार केला, ते अशोक ज्ञानोबा गायकवाड, तसेच ज्ञानोबा रामभाऊ गायकवाड, नीला ज्ञानोबा गायकवाड या चार आरोपींवर बनाट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी किशोर हेसुद्धा इमारतीच्या मालकांपैकी एक असताना, त्यांना विश्वासात न घेता इमारत विक्रीचा व्यवहार झाला. आरोपी माकने याच्याशी हा व्यवहार होत असताना, फिर्यादी किशोर यांचे संमतीपत्र बनावट तयार केले. काही कायदेशीर त्रुटी असल्याने खरेदी-विक्री व्यवहारात अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे यांनी संगनमताने बनावट कादपत्रे तयार केली. (प्रतिनिधी)