‘ईव्हीएम’ची खुल्या बाजारात विक्री

By admin | Published: April 2, 2017 02:54 AM2017-04-02T02:54:25+5:302017-04-02T02:54:25+5:30

निवडणूक म्हटले की, दक्ष सरकारी यंत्रणा, या यंत्रणेत वापरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व येते. मतपेट्या, तसेच मतदान यंत्रे अत्यंत सुरक्षित ठिकाणी

Selling 'EVM' in the open market | ‘ईव्हीएम’ची खुल्या बाजारात विक्री

‘ईव्हीएम’ची खुल्या बाजारात विक्री

Next

पिंपरी : निवडणूक म्हटले की, दक्ष सरकारी यंत्रणा, या यंत्रणेत वापरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व येते. मतपेट्या, तसेच मतदान यंत्रे अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवून पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर नेणे, उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष यंत्र सील करणे-उघडणे या प्रक्रिया होत असल्याने वापरात येणारी यंत्रणा केवळ निवडणूक आयोगाच्या कडक नियमांखाली अमलात येते. ही वस्तुस्थितीही आहे, परंतु अशा प्रकारची यंत्र केवळ शासकीय यंत्रणेतच उपलब्ध होऊ शकतात, असा नागरिकांचा गैरसमज आहे. ‘ईव्हीएम’ मशीन खुल्या बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. पुणे आणि भोसरी परिसरात ईव्हीएमची विक्री करणारे अनेक वितरक आहेत.
इंटरनेटमुळे कसलीही माहिती मिळविणे सहजशक्य आहे. ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन कोणालाही सहज खरेदी करता येते. सहकारी बँका, पतसंस्था, तसेच सहकार क्षेत्रातील अन्य उद्योग या ठिकाणी मतदान घ्यायचे असेल, तर अशा ईव्हीमएम बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. इंटरनेटवर शोध घेतल्यास आपल्या शहरातील आजूबाजूच्या वितरकांची माहिती त्यावर दिली जाते.
आॅनलाइन आॅर्डर देऊन अशी मतदान यंत्रे खरेदी करणे शक्य झाले आहे. केवळ महापालिका, जिल्हा परिषद, तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अशी मतदान यंत्रे पहावयास मिळतात. ही यंत्र शासकीय यंत्रणेशिवाय अन्य कोणाला मिळणे अशक्य आहे, असा नागरिकांच्या मनात एक समज निर्माण झाला होता. तो समज खोटा ठरणारा आहे.
शासकीय यंत्रणेत पहावयास मिळणारी इव्हीएम यंत्रासारखीच हुबेहूब आणि तशीच कार्यप्रणाली असणारी यंत्रे पुणे, भोसरी येथील वितरकांकडे उपलब्ध आहेत. या मतदान यंत्राची किंमत १० हजारांपासून ते ४१ हजार रुपयांपर्यंत आहे. भोसरीतील एका वितरकाकडे ३५ हजार ५०० रुपयांत ईव्हीएम उपलब्ध आहे. सिंगल वोट की मल्टिव्होट मशिन पाहिजे, अशी विचारणा वितरकांचे प्रतिनिधी करतात. एका मतदान यंत्रावर एकाच व्यक्तीला मत देता येईल, अशा स्वरूपाची, तसेच एकाच यंत्रावर अनेक व्यक्तींच्या नावापुढे मत देता येईल, अशाही स्वरूपाची मतदान यंत्रे आहेत. एवढेच नव्हे, तर संगणक प्रणालीवर आपणास हवा तसा
प्रोग्रॅम तयार करण्यासाठी
आॅनलाइन इलेक्ट्रॉनिक सर्किटही मागविता येते. (प्रतिनिधी)

Web Title: Selling 'EVM' in the open market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.