कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंगवर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:26+5:302021-02-16T04:13:26+5:30

जोधावत म्हणाल्या, या चर्चासत्राला शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर ...

Seminar on Artificial Intelligence and Coding | कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंगवर चर्चासत्र

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंगवर चर्चासत्र

Next

जोधावत म्हणाल्या, या चर्चासत्राला शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर आर्किड स्कूलच्या संस्थापक संचालिका लक्ष्मी कुमार, अलार्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा, एसएनबीपी स्कूलच्या प्राचार्या जयश्री वेंकटरमन, एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या बिंदू सैनी, मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मोनिका छाब्रा या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. सेजल समर-जोधावत चर्चासत्राचे संचालन करणार आहेत. या तंत्रज्ञानाविषयीच्या अफवा, जागतिक आणि भारतीय परिस्थितीबद्दल मुख्याध्यापक चर्चा करणार आहेत. या चर्चासत्रामध्ये हे धोरण राबवताना विद्यार्थी व शिक्षकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी, त्याचा वापर, भविष्यातील त्याचे महत्त्व अशा अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहे.

----

... तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू

पुणे : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही राज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होता आहेत. त्यामध्ये गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? हा सवाल आहे. शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. प्रसंगी मनोहर वाडेकर उपस्थित होते.

दहातोंडे म्हणाले, यंदा १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यात राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे जगभर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या शिवजयंतीवर अनेक निर्बंध आले असून, शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. केवळ १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूक, अभिवादन सभा, पोवाडे, व्याख्याने, नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत, शिवनेरी, रायगड तसेच अन्य कोणत्याही किल्ल्यांवर जाऊ नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी अयोग्य असून, प्रत्येक शिवप्रेमी नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करेल. त्यामुळे सरकारने ताबडतोब या अनावश्यक अटी रद्द करून उत्साहात शिवजयंती साजरी करू द्यावी. या अटी रद्द न केल्यास राज्यभरातील तमाम शिवप्रेमी, शिवभक्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी जाऊन शिवजयंती साजरी करतील.

Web Title: Seminar on Artificial Intelligence and Coding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.