कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:17 AM2021-02-28T04:17:45+5:302021-02-28T04:17:45+5:30
पुणे मनपा झोन ३ आणि धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना प्रतिबंधक उपाय ...
पुणे मनपा झोन ३ आणि धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी आयोजित चर्चासत्रात पोद्दार बोलत होत्या. यावेळी झोन ३ चे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, डॉ. विजय वरद उपस्थित होते.
यावेळी डॉ. दीपक पखाले म्हणाले की, संभाव्य रुग्णसंख्या वाढ विचारात घेता महापालिकेच्या बरोबरच खासगी रुग्णालयांनी सज्ज राहवे, खासगी डॉक्टरांनी निर्भयपणे सौम्य कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरीच विलगीकरणाचा पर्याय द्यावा.
डॉ. राजेंद्र जगताप आणि डॉ. प्रवीण दरक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीपेन मेहता यांनी यासाठी मदत केली. डॉ. राज लवंगे यांनी यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. गणेश निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.