कृषी विषयातील रोजगार संधीवर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:05+5:302021-04-13T04:09:05+5:30
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेताना, कृषी शिक्षणाचे आगामी काळातील मत्त्व पटवून देण्यासाठी कृषी व कृषी संलग्न ...
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेताना, कृषी शिक्षणाचे आगामी काळातील मत्त्व पटवून देण्यासाठी कृषी व कृषी संलग्न तसेच कृषी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रख्यात वक्त्यांची व्याख्यानमाला आयोजिली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रवींद्र वानखडे, मुख्य वनसंरक्षक शिक्षण व प्रशिक्षण, पुणे यांनी कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी, वनीकरणाचे महत्व, हवामान बदल व त्याचे परिणाम, वाइल्ड लाईफ यावर सखोल मार्गदर्शन केले.
कृषी वैज्ञानिक डॉ. नितीन भोरे यांनी भारतीय कृषी व्यवसाय, कृषि उद्योगातील संधी यावर मार्गदर्शन केले. हायसिंथ आर्या, फॅसिलिटेटर आणि कॉर्पोरेट ट्रेनर, पुणे यांनी व्यक्तित्त्व विकास, व्यावसायिक भविष्य व तरुणांच्या अपेक्षा या विषयावर भाष्य केले. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे सहयोगी प्रा. शरयू भाकरे यांनी तरुणांसाठी ग्रामीण व कृषि उद्योजकता या विषयावरती मार्गदर्शन केले.
डॉ. आरती अग्रवाल, संचालक – उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षक यांनी कृषी पद्धतींचे डिजिटलायझेशन या विषयावरती मार्गदर्शन केले.
सुमेध गुप्ते, प्रादेशिक प्रमुख, बिझिनेस स्टँडर्ड प्रा. लि. यांनी कृषी निगडित इच्छित कौशल्ये सेट्स आणि आवश्यक सहाय्यक साधने आणि तंत्र यावर मार्गदर्शन केले.
डॉ. विजय डी. पाटील, डॉ. सायली गणकर यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रा. चेतना नाईकरे व आभार प्रा. शैलेश धाकुलकर यांनी मानले. तसेच तांत्रिक सहाय्य प्रा. किरण गोसावी आणि मुकेश त्रिपाठी यांनी केले.