कचऱ्याचा फोटो व्हाट्सअप वर पाठवा अन ५०१ रुपये बक्षीस मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:37 PM2018-07-06T18:37:52+5:302018-07-06T18:39:53+5:30

ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करेल किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Send garbage Photos to Whats app and Get a 501 prize | कचऱ्याचा फोटो व्हाट्सअप वर पाठवा अन ५०१ रुपये बक्षीस मिळवा

कचऱ्याचा फोटो व्हाट्सअप वर पाठवा अन ५०१ रुपये बक्षीस मिळवा

Next
ठळक मुद्देखराबवाडी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ,कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पहिला उपक्रम

चाकण : एखाद्या वार्डात कचरा उचलला नसेल तर त्याचा फोटो सरपंचाच्या व्हाट्सअप वर पाठवा आणि ५०१ रुपये बक्षीस मिळवा, असे आवाहन खुद्द खराबवाडीच्या सरपंचांनी केले आहे. प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर परिसरातील गावांनी कठोर निर्णय घेतले असून खराबवाडी ( ता.खेड ) येथील ग्रामपंचायतने प्लॅस्टिकचा वापर टाळणे, महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण देणे व क्रांती महिला बचत गटास स्वस्त धान्य परवान्यासाठी परवानगी देणे आदी उपक्रम हाताळणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. यावेळी महिलांनी या ठरावास हात वर करून एकमुखाने मंजुरी दिली व प्लॅस्टिक वापरण्याची शपथ घेतली. 
यावेळी सरपंच खराबी म्हणाले, आम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा पहिला उपक्रम हाती घेतला. कारण ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करेल किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचारी दिवसभरात जे काम करतील त्याची नोंद ठेवणार आहे. सफाई कामगारांनी वार्डात साफसफाई करून कचरा उचलल्यानंतर त्या वार्डातील सदस्य किंवा जबाबदार व्यक्तीची सही घेण्यास सांगितले आहे. जर सही घेतली नाही तर त्या दिवसाचा पगार कपात करण्यात येणार आहे. सफाई कामगार कचरा उचलत नसेल तर नागरिकांनी आपापल्या वार्ड सदस्याकडे तक्रार करावी. अथवा कचऱ्याचा फोटो आमच्या व्हाट्सअपवर पाठवा, कचऱ्याचा फोटो पाठविणाऱ्या महिलेस ५०१ रुपयांचे रोख बक्षीस ग्रामपंचायच्या वतीने दिले जाईल. कर्मचाऱ्यांच्या शिस्ती बाबत कडक भूमिका घेतल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ते पुढे म्हणाले, गाव तंटामुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. गावातील तंटे गावातच सोडवू, वेळप्रसंगी तंटा करणाऱ्यांचे पाय धरू, त्यासाठी मी सरपंच म्हणून २४ तास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. यावेळी गावातील सर्व महिलांच्या वतीने उद्योजक अरुण जांभुळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
 

Web Title: Send garbage Photos to Whats app and Get a 501 prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.