शिवछत्रपती पुरस्कार सुधारणाबाबत सूचना पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:15+5:302021-01-21T04:11:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटनांकडून शासनाने येत्या २२ जानेवारीपर्यंत सूचना व अभिप्राय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटनांकडून शासनाने येत्या २२ जानेवारीपर्यंत सूचना व अभिप्राय मागवले आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे.
प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू असे पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासनाने गेल्यावर्षी २४ जानेवारीला प्रसिद्ध केली. यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.
पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुरस्कार नियमावलीच्या प्रस्ताव सुधारणांबाबत सूचना व अभिप्राय dsysdesk14@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in या मेलवर २२ जानेवारीपर्यंत पाठवाव्यात असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केले आहे.