ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:58 AM2021-08-02T11:58:46+5:302021-08-02T11:58:56+5:30
पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
पुणे : विद्यार्थीप्रिय शिक्षक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक प्राचार्य डाॅ. प्र. ल. गावडे यांचे दीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले.
पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिकित्सक अभ्यास करून त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली होती. त्यांचा प्रबंध “सावरकर एक चिकित्सक अभ्यास” या पुस्तक रूपात प्रकाशित झाला आहे. अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण संशोधनात्मक लेखन त्यांनी केले आहे.
नोकरी- व्यवसाय किंवा अन्य कारणामुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या, परंतु ते पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठात बहिस्थ विभाग सुरू करण्यात डॉ. वि. प. महाजन यांच्याबरोबर डाॅ. प्र. ल. गावडे यांचा सहभाग होता.