ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र केरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:37+5:302021-04-26T04:10:37+5:30

भारतीय आयुर्विमा महामंडळामधून (एलआयसी) केरकर २४ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण व्हावे यापासून ते विमा कंपन्यांच्या ...

Senior Labor leader Bhalchandra Kerkar passes away | ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र केरकर यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र केरकर यांचे निधन

Next

भारतीय आयुर्विमा महामंडळामधून (एलआयसी) केरकर २४ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण व्हावे यापासून ते विमा कंपन्यांच्या खासगीकरणाविरुद्धच्या प्रत्येक लढ्यामध्ये केरकर यांनी कामगारांचे नेतृत्व केले होते. सध्या ते ऑल इंडिया पेन्शनर्स असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. उत्तम मांडणी करून आरोग्य सेनेबरोबर दूध भेसळ लढाईमध्ये न्यायालयातून सरकारला निर्देश मिळवण्यामध्ये केरकर यांचे योगदान होते. २०१५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुणे विद्यार्थी नागरी कृती समितीमार्फत भाई वैद्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. लाल निशाण पक्ष (लेनिनवादी), पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी, पुणे शहर मोलकरीण संघटना आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ या संस्थांच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असे.

फोटो - भालचंद्र केरकर

Web Title: Senior Labor leader Bhalchandra Kerkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.