Pune Crime: पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठाची चार लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: December 29, 2023 06:17 PM2023-12-29T18:17:48+5:302023-12-29T18:19:22+5:30
हा प्रकार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडला...
पुणे : पॅनकार्ड अपडेट करून देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या विजयकुमार मधुसूदन नटराजन (वय ६०) यांनी गुरुवारी (दि. २८) पोलिसांत तक्रार नोंदविली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. तक्रारदार यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमचे पॅनकार्ड अपडेट नाही. ते अपडेट करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. तक्रारदार यांनी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी सहमती दर्शविल्यावर त्यांना लिंक पाठवून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर आरोपींना तक्रारदार यांच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळविला. त्यानंतर तक्रारदार यांच्या खासगी माहितीचा वापर करून, त्यांच्याकडून ओटीपी घेतला. फिर्यादींच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ९९ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.