Pune Crime: पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ व्यक्तीस भागडी-शिंगवे रस्त्यावर लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:13 PM2023-10-06T18:13:05+5:302023-10-06T18:13:52+5:30

याबाबत विश्वनाथ निवृत्ती उंडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे....

Senior man robbed on Bhagadi-Shingwe road by claiming to be police | Pune Crime: पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ व्यक्तीस भागडी-शिंगवे रस्त्यावर लुटले

Pune Crime: पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ व्यक्तीस भागडी-शिंगवे रस्त्यावर लुटले

googlenewsNext

निरगुडसर (पुणे) : पोलिस असल्याची खोटी बतावणी करून ज्येष्ठ व्यक्तिला लुटण्याचा प्रकार शिंगवे पारगाव - रस्त्यावर (दि. ५) रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याबाबत विश्वनाथ निवृत्ती उंडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विश्वनाथ उंडे हे (दि. ५) रोजी दुपारी अडीच वाजता त्यांचा मित्र पोपट उंडे याला घेऊन दुचाकीवर पारगाव येथून भागडी येथे जात असताना शिंगवे गावच्या हद्दीत धनगरवस्ती येथे दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबवले, आम्ही पोलिस आहोत, या ठिकाणी चरस, गांजाच्या केस झाल्या असून, आम्ही सर्वांना चेक करत आहोत, असे म्हणत ओळखपत्र दाखवून या ठिकाणी आम्ही सर्वांना चेक करत आहोत, असे म्हणाले.

त्यावेळी त्या दोघांनी फिर्यादीला त्याच्या खिशातील रुमाल काढायला सांगितला. फिर्यादीने रुमाल त्यांच्याकडे दिला असता त्यांनी तुमच्या जवळील सर्व चीज वस्तू त्या रुमालात ठेवा, असे म्हणत फिर्यादीच्या जवळील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, रोख रक्कम रुमालात ठेवून त्याची गाठ बांधून फिर्यादीचे बॅगेत ठेवली व ते निघून गेले, फिर्यादी यांनी घरी जाऊन पाहिले असता रुमालात फक्त रोख रक्कम होती. चेन व अंगठी मिळून आली नाही. याबाबत त्या दोन अज्ञात व्यक्तींनी हातचलाखी करत फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारगाव पोलिस करत आहेत.

Web Title: Senior man robbed on Bhagadi-Shingwe road by claiming to be police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.