Accident: पीएमपी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:23 IST2022-02-11T17:22:20+5:302022-02-11T17:23:26+5:30
अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला

Accident: पीएमपी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे : पीएमपी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली. याप्रकरणी पीएमपी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्यावरून पद्मावती पंढरीनाथ गायकवाड (वय ७०, रा. गोल्ड कम्फर्ट सोसायटी, विश्रांतवाडी) दुपारी चारच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी जय गणेश विश्व इमारतीसमोर पीएमपी बसने गायकवाड यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी पीएमपी बसचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी राजेश गोसावी यांनी यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करत आहेत.