पुण्यात जुगार खेळताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:32 AM2017-12-10T04:32:07+5:302017-12-10T04:32:19+5:30
पुणे पोलिसांनी मुंढवा येथील एका क्लबवर मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून माजी नगरसेवकासह ४३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलिसांनी मुंढवा येथील एका क्लबवर मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून माजी नगरसेवकासह ४३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ विजय शामराव जाधव (वय ५५) असे त्यांचे नाव असून ते बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
मुंढवा परिसरात माजी नगरसेवक अविनाश जाधव यांचा न्यू वर्ल्ड आॅफ स्पोर्ट या नावाने क्लब आहे़ जुगार अड्ड्यांचे पोकरचे लायरन्स आहे़ त्या ठिकाणी अवैधरित्या मध्यरात्रीपर्यंत तीन पत्त्यांचा जुगार खेळला जात होता़ तेथे पैसे देऊन त्याबदल्यात कॉईन घेऊन जुगार खेळला जात होता़ याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास छापा टाकला़ त्यावेळी पोलीस निरीक्षक जाधव आणि इतर ४१ जणांना अटक केली़ या ठिकाणी पोलिसांना ६ लाख ८० हजार ७६ रुपयांची रोकड, खेळण्यासाठी आलेल्यांच्या चारचाकी मोटारी, दुचाकी, मोबाईल, अंगावरील सोने, दारु असा एकूण १ कोटी ७ लाख ९२ हजार ३१० रुपयांचा माल जप्त केला आहे़