ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:43+5:302021-04-02T04:11:43+5:30
पं. सुधाकर मराठे यांचे निधन पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरु पं. सुधाकर मराठे (वय ८३) ...
पं. सुधाकर मराठे यांचे निधन
पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरु पं. सुधाकर मराठे (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे, सुना, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
वडील पं. जनार्दन मराठे यांच्याकडून संगीत शिक्षण घेतलेल्या सुधाकर यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्याालय येथून १९६३ मध्ये संगीत विषयामध्ये डॉ्रक्टरेट संपादन केली होती. ते आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रथम श्रेणी कलाकार होते. पं. जनार्दन मराठे आणि पं. सुधाकर मराठे यांनी श्री गांधर्व महाविद्याालय चालविले होते. पं. चतुर्भुज राठोड यांच्यासमवेत पं. मराठे यांनी ख्याल गायन आणि चक्री भजन जुगलबंदीचे कार्यक्रम केले होते. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि माजी राष्ट्रपती नीलम संजीव रे़ड्डी यांच्या हस्ते पं. मराठे यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या शिष्यांमध्ये प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण यांच्यापेकी श्रवण राठोड, धनंजय मराठे, सुधाकर चव्हाण, संध्या केळकर आणि भजन गायक सुनील भोग यांचा समावेश आहे.
.....................................