ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

By नम्रता फडणीस | Published: October 9, 2023 11:46 AM2023-10-09T11:46:21+5:302023-10-09T11:47:58+5:30

सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सुरुवातीपासून सक्रिय असणारे आणि बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत....

Senior Social Worker Dr. Zainab Poonawala passed away | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

googlenewsNext

पुणे : बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात सना वैद्य असा परिवार आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सुरुवातीपासून सक्रिय असणारे आणि बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत.

डॉ. झैनब पूनावाला यांचे पार्थिव एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सामाजिक कृतज्ञता निधीचे विश्वस्त डॉ. बाबा आढाव, अन्वर राजन, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पूनावाला यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आले. वैद्यकीय संशोधनासाठी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आला.

बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीत डॉ. झैनब यांनी ताहेरभाई यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. बोहरा समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. 'या बहिष्कारामुळे मोठे जग पाहता आले', असे ताहेरभाई नेहमी सांगत. सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांसह विविध परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यात पूनावाला दाम्पत्याने सक्रिय सहभाग घेतला होता.

Web Title: Senior Social Worker Dr. Zainab Poonawala passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.