ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:52 PM2021-05-05T18:52:15+5:302021-05-05T18:53:27+5:30

राज्य शासनाचा“आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. ...

Senior tabla player Pandit Vinayakrao Thorat passed away in pune | ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

googlenewsNext

पुणे : मराठी संगीत नाटकांमध्ये तबला संगतीतून नाट्यपदांना श्रवणीयतेच्या परमोच्च बिंदूपर्यंत नेणारे ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात ( वय ८५) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी प्रमिला आणि शिष्य परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हडपसर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संगीत क्षेत्रात 'छोटूकाका' या नावाने ते परिचित होते. पं. विनायक थोरात यांचा जन्म १८ मे १९३५ रोजी झाला.त्यांचे बालपण दौंड येथे गेले. वडील रेल्वेत नोकरीत तसेच तबलावादक असल्याने त्यांना लहानपणीच तबल्याची गोडी लागली. सुरुवातीला तबल्याचे शिक्षण त्यांनी वडिलांकडे, नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने घेतले. रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाल्याने ताल, लय, सूर पक्के होऊन त्यांना लयीचे ज्ञान प्राप्त झाले. ते एकल तबला वादनाचे कार्यक्रम करत होते. 

तरुणपणात शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक मंडळींना त्यांनी संगत केली. त्यामध्ये प्रामुख्याने मोगुबाई कुर्डीकर, पं.जसराज, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. फिरोज दस्तूर,ज्योत्स्ना भोळे, वसंतराव देशपांडे, राम मराठे इत्यादींना त्यांनी उत्तम साथ दिली. मात्र १९६२ नंतर नाट्यसंगीताला साथ करण्याकडे त्यांचा कल वाढला आणि छोटा गंधर्व जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार यांच्या सोबत तब्बल ४५ वर्ष त्यांनी संगत केली. गाण्याबरोबर जाणारी आणि गायनावर कुरघोडी न करणारी त्यांची तबला साथ रसिकांच्या स्मरणात राहील.

राज्य शासनाचा“आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. ......

Web Title: Senior tabla player Pandit Vinayakrao Thorat passed away in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.