ज्येष्ठ स्वयंसेवक व बँकेचे अधिकारी विजय साळवे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:35+5:302021-05-11T04:12:35+5:30
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व जनसेवा सहकारी बँकेचे मार्केटिंग अधिकारी विजय दादू साळवे (वय ४७ ) ...
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व जनसेवा सहकारी बँकेचे मार्केटिंग अधिकारी विजय दादू साळवे (वय ४७ ) यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. त्यांच्यावर सीओईपी येथील जम्बो कोविड केंद्रावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
१९६६ साली जनसेवा बँकेत ते लिपिक म्हणून रुजू झाले होते. एमए, एम.फिल., व एमएसडब्ल्यू व पत्रकारिता असे शिक्षण झाले होते. बँकेत बराच काळ ते जनसंपर्क अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दिवंगत श्रीपती शास्त्री यांच्या ते जवळचे होते, तर सध्या संघाच्या धर्मजागरण समितीची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे होती.
मूळचे कोंढवा बुद्रुक येथील रहिवासी असलेले साळवे हे नंतर मुळारोड येथे राहायला गेले, तिथून त्यांनी संघाचे काम सुरू केले होते, सध्या ते वारजे येथे राहत होते, अतिशय प्रामाणिक, हुशार, सुसंस्कृत, सृजनशील अधिकारी असलेले विजय साळवे हे बँकेत व संघात सर्वांना जवळचे होते त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.