अर्जुन परदेशाचा समीहन देशमुखवर सनसनाटी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:22+5:302021-03-24T04:11:22+5:30
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या ...
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित अर्जुन परदेशी याने अव्वल मानांकित समीहन देशमुखचा ६-१ असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
महाराष्ट्र मंडळ टेनिस कोर्ट मुकुंदनगर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित नमिश हूड याने वीरेन चौधरीचा ६-२ असा तर, आर्यन कीर्तने याने राघव सरोदेचा ६-३ असा पराभव केला. स्वर्णीम येवलेकर याने तनिष्क देवरेला ६-१ असे नमविले.
मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत आस्मि टिळेकर, स्वानिका रॉय, ध्रुवा माने, काव्या देशमुख यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्यपूर्व फेरी : मुले :
अर्जुन परदेशी (७) वि.वि. समीहन देशमुख (१) ६-१;
नमिश हूड (५) वि.वि. वीरेन चौधरी ६-२;
आर्यन कीर्तने वि.वि. राघव सरोदे ६-३;
स्वर्णीम येवलेकर वि.वि. तनिष्क देवरे ६-१;
मुली : आस्मि टिळेकर (१) वि.वि. अनुष्का जोगळेकर ६-१;
स्वानिका रॉय वि.वि.वीरा हरपुडे ६-२;
ध्रुवा माने (३) वि.वि. रित्सा कोंडकर ६-१;
काव्या देशमुख (२) वि.वि. माहिका रेगे ६-५ (२).