जोशीच्या भेदक गोलंदाजीमुळे ‘व्हिजन’चा सनसनाटी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:15+5:302021-02-26T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने श्री सिद्धिविनायक ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघावर एक डाव व ४० धावांनी विजय मिळवला.
सिंहगड रस्त्यावरील व्हिजन स्पोर्ट्स सेंटर मैदानावर सुरू स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत पहिल्या डावात सिद्धीविनायकने प्रथम फलंदाजी करताना ७८.३ षटकांत २८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी व्हिजन क्रिकेट अकादमीने ८३ षटकांत ८ बाद ४१९ धावा केल्या. गुरुवारी त्यांचा डाव पुढे नेत १०५.४ षटकांत ४८९ धावा करून पहिल्या डावात त्यांनी दमदार आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात गणेश जोशी ५८-६ याने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे सिद्धिविनायकचा डाव ४९.१ षटकांत १६२ धावावर संपुष्टात आला. सिद्धार्थ रोमन (४८ धावा) व रिषभ पारख (२५ धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १०६ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यावर संदीप शिंदे (५० धावा) वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
संक्षिप्त धावफलक : पहिला डाव
श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब : ७८.३ षटकांत सर्वबाद २८७ धावा वि.व्हिजन क्रिकेट अकादमी : १०५.४ षटकांत सर्वबाद ४८९ धावा, मयूर खरात २४, हृषीकेश मोटकर १८९, शौनक त्रिपाठी ७३, प्रीतेश माधवन ३३, कुलदीप यादव ३३, रोनक राठी ५९. कुणाल तांजने २६-१०७-४, सारीश देसाई ३४. ४-१३४-६ ; पहिल्या डावात व्हिजन क्रिकेट अकादमीकडे २०२ धावांची आघाडी;
दुसरा डाव : श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब : ४९.१ षटकांत सर्वबाद १६२ धावा, सिद्धार्थ रोमन ४८, संदीप शिंदे ५०, रिषभ पारख २५, गणेश जोशी १७.१-५८-६, रोनक राठी ११-२५-२, शौनक त्रिपाठी ८-२६-१; सामनावीर - हृषीकेश मोटकर; व्हिजन क्रिकेट अकादमी संघ एक डाव व ४० धावांनी विजयी.