नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:26 AM2018-09-27T01:26:03+5:302018-09-27T01:26:24+5:30

दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली.

Sensitivity is important ... | नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची...

नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची...

Next

पुणे : दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली असून वेगवेगळ्या माध्यमातून निसर्गाच्या सहवासात राहण्याची संधी पर्यटक घेत आहेत. वरकरणी हे चित्र जरी सुखावणारे असले तरी पर्यटनाच्या निमित्ताने अति व्यावसायिकवृत्तीमुळे त्या पर्यटनस्थळाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे.

दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून दोन घटका निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे. हल्ली लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता, निसर्गाच्या अभ्यासाकरिता, याबरोबरच टेÑकिंगसाठी पर्यटन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये टुरिझमची क्रेझ असली तरी त्याबरोबरच काही महत्वकांक्षी व्यावसायिकांच्या धोरणाचा फटका निसर्गाला बसत आहे.
याविषयी पुरातत्व व पर्यावरण विषयाच्या अभ्यासक तसेच संशोधनाकरिता नेहमीच भटकंती करणाºया साईली पलांडे-दातार यांनी सांगितले, इतिहासाचा वारसा समजून घेण्याकरिता, विविध महोत्सव अभ्यासण्याच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्ता गावांमधील यात्रा उत्सवाचा आनंद घेण्याच्या औचित्याने भटकंती करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
यावेळी त्या पर्यटनस्थळी स्थानिकांना रोजगार मिळणे हे जरी स्वाभाविक असले तरी दुसरीकडे अतिव्यावसायिक दृष्टीकोनातून पर्यटकांची लूट होताना दिसते. विषय केवळ व्यावसायिकतेचा नसून पर्यटकांच्या बदलत्या मानसिकतेचा देखील आहे. आजकाल वाढत्या माध्यमांमुळे संबंधित पर्यटनस्थळांविषयीची माहिती तात्काळ उपलब्ध होते.
पध्दतशीर नियोजन करुन तिथे भेट दिली जाते. परंतु पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा इतर गोष्टींमध्येच अधिक रमताना दिसतात. यात सर्वाधिक वेळ ते ‘सेल्फी’मध्ये घालवतात. स्वयंशिस्तीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
शासकीय यंत्रणेने काही संस्था स्थापन करुन आपली जबाबदारी झटकल्याचे पाहवयास मिळते. शासनाच्या त्या पर्यटन संस्थांकडून केवळ हॉटेलिंगचीच माहिती मिळते असा अनुभव पर्यटकांचा आहे.

‘कास’चा अट्टाहास कशाला ?
सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांचा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गेल्या काही वर्षांपासून कासचा बºयापैकी प्रचार-प्रसार झाल्याने त्याविषयी पर्यटकांना कुतूहल असते. मात्र त्याठिकाणी सध्या वाढत जाणाºया पर्यटकांच्या संख्येमुळे दहा वर्षांपूर्वी फुलणारी फुले आता फुलताना दिसत नाही. नाशिक-गोवा दरम्यान असणाºया पठारांवर देखील वेगवेगळी फुलं फुलतात. मात्र त्याविषयी पर्यटकांना माहिती नसल्याचे साईली सांगतात.

Web Title: Sensitivity is important ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.