लहान मुलांसाठी स्वतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:49+5:302021-05-30T04:08:49+5:30
-उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार : बारामतीतील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा बारामती : संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार घेऊन लहान ...
-उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार : बारामतीतील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
बारामती : संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वाॅर्ड सर्व सुविधेसह सुरू करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादूभार्वाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा शनिवारी (दि.२९) उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद पुणे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सभापती नीता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे चालू आहेत. शेती संबंधित कामे निर्बंधांच्या कालावधीत अडता कामा नये याची दक्षता घ्यावी. प्रत्येक रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती संच उभारण्यावर भर द्यावा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बारामती तालुक्यात बेड उपलब्ध असल्यास गृहविलगीकरण बंद करण्यात यावेत. शक्य असल्यास पेशंटच्या इच्छेनुसार खासगी रुग्णालयात विलगीकरण करण्यात यावे.
दरम्यान बारामती शहर पोलीस कार्यालयातील महासंचालक पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे हे ३१ मे रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
२९ बारामती—०८
===Photopath===
290521\29pun_2_29052021_6.jpg
===Caption===
२९ बारामती—०८