तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 02:08 PM2021-06-19T14:08:58+5:302021-06-19T14:10:03+5:30
राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय
नागरिक ज्या प्रमाणात बाहेर पडत आहेत ते लक्षात घेता जिल्ह्याबाहेर पडणाऱ्या लोकांना 15 दिवसांचे विलगिकरण बंधनकारक करण्याचा विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. पुण्यामध्ये आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.
संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी राज्यात रुग्ण संख्या कमी झाले नाहीये. त्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
"आजच्या बैठकीत नवीन विषय पुढे आले. शनिवार रविवार देखील चालू राहणार नाही पुढचा शनिवार रविवार परिस्थीती आटोक्यात आलं तर पुन्हा विचार. काही जिल्ह्यांमध्ये अजून प्रमाण आहे.खूप मोठ्या प्रमाणावर शनिवार रविवार प्रचंड गर्दी आणि रांगा लागत आहेत. नागरी का असं करतायेत कळत नाही. नागरिकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.जास्त लोक बाहेर जात राहिले तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या लोकांना 15 दिवस विलागिकरणात राहावे लागेल याचा विचार सुरू."
दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे असे सांगताना पवार म्हणाले,"अनेक देशात लसीकरण होऊनही पुन्हा लाट आली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या मृत्यूंचा अभ्यास केला तर 60% मृत्यू हे 60 पेक्षा कमी वयाचा लोकांचे आहेत. पुढच्या आठवड्यात पुण्याचा देखील अहवाल सादर करण्याचे आदेश. 43% लोक कोणताही आजार नसणारे आहेत.महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे."
कोव्हॅक्सिन बाबत परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत पवार म्हणाले ," लस घेतलेल्यांना दुसऱ्या लसींचा डोस घेता येणार नाही असा तज्ञांचे मत. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी लस घेता येणार नाही.जी घेतली आहे त्याला परवानगी मिळण्याची वाट पाहावी लागेल."
दरम्यान पुढचा आठवड्यात होणाऱ्या ओबीसी आरक्षणाचा बैठकीबाबत मी संबंधितांशी याबाबत चर्चा करेन आणि नियम पाळावे यासाठी सूचना देईन असे पवार म्हणाले.दरम्यान पर्यटनासाठी शनिवार रविवार बाहेर पडायचे कारण नाही इतर दिवशी नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.