गुरोळी येथे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:24+5:302021-05-07T04:12:24+5:30
सासवड : पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे निदान झाल्यावर प्राथमिक काळजी घेतल्यास रुग्ण अगदी घरीच बरा होऊ शकतो. ...
सासवड : पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे निदान झाल्यावर प्राथमिक काळजी घेतल्यास रुग्ण अगदी घरीच बरा होऊ शकतो. कोरोना प्राथमिक टप्प्यात बरा होणारा आजार आहे. परंतु आवश्यकता आहे प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. नातेवाइकांनी डॉक्टर न होता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावेत, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.
गुरोळी येथे २५ खाटांच्या विलगीकरणाचे उद्घाटन संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय जगताप, प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, सरपंच उज्ज्वलाताई जाधव, उपसरपंच मधुकर खेडेकर, धर्माजी खेडेकर, हिरामण खेडेकर, बापूसो शिंगाडे, जयसिंग भोसले, ज्ञानदेव खेडेकर, जगन्नाथशेठ जगताप, भाऊसाहेब शिंगाडे, महादेवशेठ शिंगाडे, मधुकर खेडेकर, अजय खेडेकर, सनी खेडेकर, जालिंदर खेडेकर, गोरख खेडेकर, किसन खेडेकर, आनंद खेडेकर, मस्कू खेडेकर, तलाठी सतीश मोकाशी, ग्रामसेविका एस. डी. झगडे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संदीप खेडेकर, विकास खेडेकर आदी या वेळी उपस्थित होते.