पारगाव येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारला विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:48+5:302021-05-10T04:11:48+5:30
पारगाव येथील पारेश्वर विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात ...
पारगाव येथील पारेश्वर विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले. कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासाठी या विलगीकरण कक्षाची चांगल्या पद्धतीने मदत होईल तसेच कोविडला न घाबरता काळजी घेऊन त्यावर मात केल्यास आपण नक्कीच या लढाईत जिंकू, पारगावप्रमाणे इतर गावांनी देखील विलगीकरण कक्ष तयार करावेत, असे मत या वेळी सुळे यांनी व्यक्त केले. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही विलगीकरण कक्षास भेट दिली.
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुरू केलेल्या या विलगीकरण केंद्रामध्ये वीस बेडची सोय करण्यात आली आहे. तसेच नाष्टयाची देखील सोय करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी कोविड पॉझिटिव्ह आल्यास आता घरी न राहता संसर्ग रोखण्यासाठी गावातील विलगीकरण कक्षामध्ये यावे, असे आवाहन पारगावच्या सरपंच प्रियंका मेमाणे यांनी केले. तसेच, पॉझिटिव्ह कोणी घरी राहिल्यास किंवा इतरत्र फिरताना आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती या वेळी पोलीस पाटील सारिका सावंत यांनी दिली आहे. या वेळी ऑनलाईनच्या माध्यमातून दिगंबर दुर्गाडे, सभापती नलिनी लोळे, गौरी कुंजीर, सुनीता कोलते, पी. एस. मेमाणे, संतोष कोलते, ग्रामपंचायत उपसरपंच महेश मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मेमाणे, ज्योती भाऊसाहेब मेमाणे, शीतल गायकवाड, अर्चना मेमाणे, ज्योती मेमाणे, ग्रामसेवक कमल कुंजीर, तलाठी सतीश उमप आदी उपस्थित होते.
पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे पारेश्वर विद्यालयामध्ये विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करीत असताना सुनीता कोलते समवेत सरपंच प्रियांका मेमाणे ,चेतन मेमाणे ,पी.एस.मेमाणे व इतर.