नाशिक पॅटर्नवर शिक्कामोर्तब

By admin | Published: April 5, 2015 12:34 AM2015-04-05T00:34:49+5:302015-04-05T00:34:49+5:30

सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काँग्रेसला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा वाटा दिला आहे.

Sequence of Nashik Pattern | नाशिक पॅटर्नवर शिक्कामोर्तब

नाशिक पॅटर्नवर शिक्कामोर्तब

Next

पुणे : सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काँग्रेसला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा वाटा दिला आहे. त्यामुळे नाशिक पॅटर्न आता पुणे महापालिकेतही कायम झाला असून, राष्ट्रवादीला भविष्यात मदत करण्याच्या आश्वासनावर मनसेला शहर सुधारणा समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने
शनिवारी झालेल्या निवडणुकीत मतदान केले.
या समित्यांवर अनुक्रमे अ‍ॅड. रूपाली पाटील आणि अचर्ना कांबळे यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागली. तर विधी समिती आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे महेंद्र पठारे आणि सुनील गोगले यांची निवड झाली. मात्र, राष्ट्रवादीने मनसेचा पाठिंबा घेत त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतल्याने नाराज झालेल्या काँग्रेसने या चारही समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर बहिष्कार टाकत आपला राग व्यक्त केला आहे.
मागील महिन्यात झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू होती. काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीने नकार दिल्याने कॉंग्रेसने परिवहन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत, शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीकडून विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस एवढेच संख्याबळ असलेल्या मनसेला हाताला धरत, कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी मनसेला दोन अध्यक्षपदे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, आज राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारांना तर मनसेने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करत निवडून दिले.
तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी मनसे आणि राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल न केल्याने भाजपाच्या नगरसेविका मनीषा चोरबेले या बिनविरोध निवडून आल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी काम पाहिले. नगरसचिव सुनील पारखी, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, सेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपाच्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होत्या.
(प्रतिनिधी)

काँग्रेसचा बहिष्कार
या सर्व समित्यांमध्ये काँग्रेसचे प्रत्येकी २ नगरसेवक होते. त्यामुळे काँग्रेसला या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यपक्षासाठी सूचक आणि अनुमोदक नसल्याने अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यातच समविचारी असलेल्या राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, निवडणूक सुरू होताच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, आपल्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगत निघून गेले.

Web Title: Sequence of Nashik Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.