पिरंगुट घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच; मालवाहक ट्रक मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 02:45 PM2023-09-10T14:45:48+5:302023-09-10T14:46:20+5:30

सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने अपघात

Series of accidents continue in Pirangut Ghat; A cargo truck entered the parking lot of the mall! | पिरंगुट घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच; मालवाहक ट्रक मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला!

पिरंगुट घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच; मालवाहक ट्रक मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला!

googlenewsNext

पिरंगुट: पिरंगुट (ता,मुळशी) घाटामध्ये अपघाताची मालिका ही सुरूच असून पुन्हा एकदा आज (रविवार, 10) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याच्या कारणाने पुण्याहून पौडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहक ट्रकचा अपघात झाला असून हा ट्रक लवळे फाटा येथील असलेल्या ऑक्सफोर्ड मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पिरंगुट घाटामध्ये वरचेवर अपघात घडण्याचे प्रसंग चालू असताना आता या घाटाला मृत्यूचा घाट म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.त्यातच पुन्हा एकदा आज रविवार दि.10 रोजी  सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा (MH12 QG 3381) अपघात घडला आहे.यामध्ये या गाडीचे  घाटामध्येच ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या उताराने खूप वेगाने हा ट्रक लवळे फाट्यापर्यंत आला त्यावेळी गाडीचे ड्रायव्हर मारुती भागवत कदम (वय वर्ष 42 रा,वडगाव बुद्रुक ता,हवेली जि.पुणे) यांनी प्रसंगावधान राखत उजव्या बाजूला असलेल्या लाईटच्या पोलला धडकविला परंतु या ट्रकचा वेग इतका जोरात होता की या ट्रकने जमिनीमध्ये पुरलेल्या या लाईटच्या पोलला  जमिनी मधून उपटून सोबत घेऊन चालू असलेल्या विद्युत वाहक तारा तोडून लवळे फाटा येथे बाजूला असलेल्या ऑक्सफर्ड मॉल च्या पार्किंग मध्ये जाऊन पडला.हा अपघात इतका भयंकर होता की या ट्रकचे पुढील दोन्ही चाक तुटून बाजूला पडले होते.

ज्या क्षणी या ट्रकचे ब्रेक रिकामी झाले त्यावेळी ज्या गाडीमध्ये माल खाली करण्यासाठी तीन मजूर देखील प्रवास करत होते तेव्हा ड्रायव्हरने प्रसंगावधान राखीत त्या सर्वांना ब्रेकफेल झाल्याची कल्पना दिली तेव्हा तिघांनी ही या गाडीमधून उड्या मारल्या व ड्रायव्हरने देखील शेवटच्या क्षणी गाडीमधून उडी मारली त्यामुळे या चौघांचे प्राण वाचले आहेत परंतु या घटनेमध्ये ड्रायव्हर हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावरती लवळे फाटा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्याला सोडून देण्यात आले.

ट्रक चालकाचे देखील होतेय कौतुक

या दुर्घटनेमध्ये ट्रक चालकाने गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर जाणून बुजून आपला ट्रक रस्ता सोडून उजव्या बाजूला लाईटच्या पोराला धडकविला परंतु चुकून जरी हा ट्रक सरळच पुढे आला असता किंवा उजव्या बाजू ऐवजी डाव्या बाजूला जरी वळविला असता तरी देखील मोठी जीवितहानी झाली असती त्यामुळे नागरिकांच्या वतीने ड्रायव्हरच्या या कृतीचे कौतुक देखील केले जात आहे. तरी या संपूर्ण घटनेची नोंद हि पौड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास हा पौड पोलीस स्टेशनंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड व निवास जगदाळे हे करीत आहेत.

पिरंगुट घाटामध्ये वारंवार घडत असलेल्या अपघातानंतर या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची अनेक वेळा नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात येत असताना देखील या मागणीला संबंधित प्रशासनाच्या वतीने केराची टोपली दाखवित असल्याचा  आरोप ग्रामस्थांचा वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत या ठिकाणी घडलेल्या अपघातामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तरी देखील अजूनही संबधित प्रशासनाला जाग येत नसल्याची मोठी खंत देखील नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Series of accidents continue in Pirangut Ghat; A cargo truck entered the parking lot of the mall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात