बारामती एमआयडीसी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:30 PM2018-06-29T13:30:40+5:302018-06-29T13:31:35+5:30

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून फिर्यादीच्या घरावर या सराईत गुन्हेगाराने दगडफेक केली.यावेळी संतप्त झालेल्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला.

Serious criminal murderd in Baramati MIDC area | बारामती एमआयडीसी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खुन

बारामती एमआयडीसी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खुन

googlenewsNext
ठळक मुद्देअल्पवयीन असतानाच त्याच्यावर पोलिसांकडे १५ गु्न्हे दाखल

बारामती : बारामती एमआयडीसी परीसरातील जळोची येथे गुरुवारी (दि २८) मध्यरात्री १२.३०च्या सुमारास सराईत गुन्हेगाराचा खुन झाल्याची घटना घडली. पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून फिर्यादीच्या घरावर या सराईत गुन्हेगाराने दगडफेक केली.यावेळी संतप्त झालेल्या फिर्यार्दीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. छोटा विमल या नावाने तो भागात् ओळखला जात होता.याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात सुरु आहे.पोलीस सुत्रांंनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय उर्फ छोटा विमल कांतीलाल जमदाडे (वय २०) असे याचे नाव आहे. हौसेराव देवकाते यांचे हॉटेल आहे. देवकाते यांना अक्षय याने दोन तीन महिन्यापूर्वी खंडणी मागितली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटक केल्यानंतर अक्षय येरवडा कारागृहात होता. दोन-तीन दिवसांपूर्वी तो सुटुन आला होता.त्याने रात्री देवकाते यांच्या घरावर पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून दगडफेक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या देवकाते यांच्या कुंटुंबातील काहीजणांसह त्यांच्या नातेवाईकांनी अक्षय यास जबर मारहाण केली.यामध्ये अक्षय याचा मृत्यु झाला. याप्रकरणी ८ ते ९ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अक्षय हा सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांत नोंद आहे. अल्पवयीन असतानाच त्याच्यावर पोलिसांकडे १५ गु्न्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Serious criminal murderd in Baramati MIDC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.