कोरोना संकटावर ‘फिक्की फ्लो’मध्ये गंभीर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:53+5:302021-05-08T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात आलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात आलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांची पराकाष्ठा चालू आहे, असे पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
फिक्की फ्लोच्या पुणे चँप्टरने आयोजित केलेल्या ‘कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेची सद्यस्थिती’ या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. संस्थेच्या सहसचिव सोनया राऊ यांनी त्यांचा परिचय करुन दिला. अध्यक्ष उषा पूनावाला यांनी संयोजन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष नीलम सेवलेकर यांनी आभार मानले.
डॉ. शिसवे यांनी रुग्णालयांची सद्यस्थिती, ऑक्सिजनची कमतरता याबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळायला हवेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी पुणेकर काय करु शकतात याची चर्चा त्यांनी केली.
“महिला सक्षमीकरणासाठी प्रशासनाला कसे साह्य करता येईल,” अशी विचारणा पुनावाला यांनी केली. त्यावर डॉ. शिसवे यांनी सांगितले की, पोलिसांच्या मदतीने फिकी फ्लोने कृती दलाची स्थापना करावी. या दलाने आसपासच्या परिसरातील नागरिक नियमांची अंमलबजावणी करतात का, मास्क लावतात का, स्वच्छता राखतात का याबाबत जनजागृती करावी.