सिरम इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 21:13 IST2023-11-17T21:12:53+5:302023-11-17T21:13:19+5:30
सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हाॅस्पिटलने दिली आहे.

सिरम इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका
पुणे : सिरम इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (वय 82) यांना गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा सौम्य झटका आला हाेता. त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी करण्यात आली असून आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हाॅस्पिटलच्या वतीने देण्यात आली.
सायरस पुनावाला यांना गुरूवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दि. 17 रोजी पहाटे डॉ. सायरस पूनावाला यांच्यावर डॉ. परवेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी केली. आता ते लवकर बरे होत आहेत. रविवारपर्यंत पुनावाला यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पूनावाला यांची तब्येत चांगली आहे, अशी माहिती रुबी हॉस्पिटल चे सल्लागार अली दारुवाला यांनी दिली.