पुरंदर येथील ओम शक्ती मठात सेवकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:39 PM2018-05-08T13:39:24+5:302018-05-08T13:39:24+5:30

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील ओम शक्ती बाबा आश्रमात सेवकाचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Servant murder in Om Shakti aashram at Purandar | पुरंदर येथील ओम शक्ती मठात सेवकाचा खून 

पुरंदर येथील ओम शक्ती मठात सेवकाचा खून 

googlenewsNext
ठळक मुद्देमठात मयत व्यक्तीशिवाय कुणीही राहत नसल्याने मठ बंदच रविवारी रात्री सेवक झोपेत असताना खुन

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील ओम शक्ती बाबा आश्रमात सेवकाचा खुन झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय७० रा. भरतगाव, ता. दौड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून अज्ञात इसमाकडून त्यांचा खून करण्यात आला आहे. खूनप्रकरणी जेजुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील ऐतिहासिक शिवमंदिर भुलेश्वर जवळ पूर्वेला डोंगराच्या कुशीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून डॉक्टर राजेंद्र लालचंद नहार यांनी काही वर्षांपूर्वी सात आठ खोल्यांचा ओम शक्ती बाबा आश्रम मठ बांधलेला आहे. या ठिकाणी मठाची साफसफाई देखभाल करण्यासाठी मृत दगडू टेमगिरे यांची नियुक्ती केलेली होती. 
मठात मयत व्यक्तीशिवाय कुणीही राहत नसल्याने मठ बंदच होता. 
खुनाची घटना रविवारी रात्री सेवक झोपेत असताना घडली. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील करत आहे.  

Web Title: Servant murder in Om Shakti aashram at Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.