नोकरांनी केले १३ लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:49+5:302020-12-03T04:19:49+5:30

माधव फडके (वय ५९, रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार तब्बल २ वर्षांनी उघडकीस आला आहे. फिर्यादी ...

Servants made jewelery worth Rs 13 lakh | नोकरांनी केले १३ लाखांचे दागिने लंपास

नोकरांनी केले १३ लाखांचे दागिने लंपास

Next

माधव फडके (वय ५९, रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार तब्बल २ वर्षांनी उघडकीस आला आहे. फिर्यादी यांचे वडील बंगल्यात एकटे राहतात. त्यांच्या देखरेखीसाठी व घरकामासाठी एक पुरुष व एक महिला यांची नेमणूक केली आहे. या दोघांनी नोव्हेंबर २०१८ ते आजपर्यत पोटमाळ्यावर ठेवलेले १३ लाख १७ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही बाब फिर्यादी यांना नुकतीच लक्षात आली. चाेरीच्या ऐवजामध्ये त्यांच्या पुर्वजांचे दागिने होते. फिर्यादी यांच्या कुटुंबामध्ये वाटणी होणार होती. वाटणीसाठी पोटमाळ्यावरील दागिने काढले तेव्हा चोरीचा हा प्रकार समोर आला. पोलीस सध्याचे व यापूर्वीच्या नोकरांकडे चौकशी करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Servants made jewelery worth Rs 13 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.