वरवंडचा सेवा रस्ता आहे का मृत्यूकडे चाललेली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:35+5:302021-09-12T04:14:35+5:30
वरवंड येथील असणाऱ्या सेवा हा पाटस- वरवंडदरम्यान फक्त एका बाजूला आहे. नागरिकांना या सेवा रस्त्याच्या कौठीचा मळा, पिंपळाचा ...
वरवंड येथील असणाऱ्या सेवा हा पाटस- वरवंडदरम्यान फक्त एका बाजूला आहे. नागरिकांना या सेवा रस्त्याच्या कौठीचा मळा, पिंपळाचा मळा, पाटील मळा, आणा पांडुरंग वस्ती व असे अनेक ठिकाणी जाण्यासाठी या एकाच सेवा रस्त्याचा वापर केला जात आहे. वास्तविक पाहता चौफुला - वरवंड- पाटसदरम्यान सेवा रस्ता होणे गरजेचे होते. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता झाला असता. मात्र, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना नाहक
आपला जीव गमवावा लागला आहे. सेवा रस्ता दोन्ही बाजूला असणे आवश्यक असते. मात्र, एकाच बाजूला असल्यामुळे एकाच असणाऱ्या सेवा रस्त्याच्या वापर केला जात आहे.
वरवंड येथे असणाऱ्या सेवा रस्त्यावर कौठीचा मळा दरम्यान मोठ्या प्रमाणात हॉटेल आहेत या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक हे सेवा रस्त्यावर सर्रासपणे वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे वारंवार अपघात होतात. ग्रामस्थांना व प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तसेच चौफुला ते वरवंड, वरवंड ते चौफुलादरम्यान काही ठिकाणी सेवा रस्ता आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात सेवा रस्त्यावर वाहने उभी केली जातात व मोठ्या प्रमाणात दुकानाचे वस्तू रस्त्यावर ठेवली जातात.
वरवंड येथे शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान कौठीचा मळा येथे सेवा रस्त्यावर चहा पिण्यासाठी एक ट्रक थांबलेला असताना मागून येणाऱ्या मोठ्या कंटेनर टेलर गाडीने उभा असलेल्या गाडीला धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. नाही तर मोठा अनर्थ झाला असता.
फोटो ओळ - अपघातग्रस्त वाहने.