सेवा रस्ता झाला अखेर मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:49+5:302021-05-29T04:08:49+5:30
कुरकुंभ: येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यातून सोडलेले रासायनिक दूषित पाणी पुणे-साेलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर येत होते. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारीनंतर ...
कुरकुंभ: येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यातून सोडलेले रासायनिक दूषित पाणी पुणे-साेलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर येत होते. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारीनंतर तहसीलदारांनी वेळात वेळ काढून तेथे पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. शनिवारी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने रस्त्यावर आलेले दूषित पाणी उपसण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सेवा रस्त्यावर येणाऱ्या दूषित पाण्यावरून रणकंदन सुरू होते. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात येणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याच्या चाऱ्या बुजवल्याने हे दूषित पाणी थेट रस्त्यावर जमा झाले होते. परिणामी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होऊन महामार्गावरून उलट दिशेने प्रवास करण्याचे धाडस कामगार व ग्रामस्थांना करावे लागत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. तसेच दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली हाती. वारंवार तक्रार करूनही कोणीही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी स्वत: यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची परिस्थीती निर्माण होताच तहसीलदार संजय पाटील यांनी प्रदूषण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी यांची बैठक घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यावर तत्काळ कारवाई करून हे दूषित पाणी रस्त्यावरून उपसण्यात आले आहे तर ज्या ज्या प्रकल्पातून हे दूषित पाणी येत आहे. अशा दोषी कंपनीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा व औद्योगीक विकास महामंडळाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या पाण्याच्या गळतीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून यावर तत्काळ कारवाई सुरु करण्यात आली आहे. संशयित कंपन्यासमोर मोठ्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून पाणीपुरवठ्यामधील गळती शोधण्याचे काम युद्धपातळीवर हातात घेण्यात आले आहे. प्रदूषण मंडळाचे अधिकारी कुरकुंभ येथे तळ ठोकून असल्याने सध्या दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांनी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मात्र ह्या कारवाईचा फार्स किती दिवस आवळला जातोय यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
२८ कुरकुंभ
महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील रासायनिक दूषित पाणी उचलल्याने रस्ता खुला झाला आहे.
२८ कुरकुंभ १
औद्योगिक क्षेत्रातील पाणीगळती देखील थांबवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
===Photopath===
280521\28pun_2_28052021_6.jpg~280521\28pun_3_28052021_6.jpg
===Caption===
२८ कुरकुंभ महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील रासायनीक दुषित पाणी उचलल्याने रस्ता खुला झाला आहे. २८ कुरकुंभ १औद्योगीक क्षेत्रातील पाणी गळती देखील थांबवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.~२८ कुरकुंभ महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील रासायनीक दुषित पाणी उचलल्याने रस्ता खुला झाला आहे. २८ कुरकुंभ १औद्योगीक क्षेत्रातील पाणी गळती देखील थांबवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.