दिवाळीनिमित्त पुणे शहरातून विशेष रेल्वे गाड्यांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:59 AM2019-10-19T11:59:51+5:302019-10-19T12:00:25+5:30
मध्य रेल्वेने दिवाळीनिमित्त पुण्यातून दानापूर व बल्लारशाह स्थानकापर्यंत विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेने पुण्यातून दानापूर व बल्लारशाह स्थानकापर्यंत विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर साप्ताहिक सुविधा गाडीच्या आठ तर बल्लारशाह सुविधा गाडीच्या २ फेऱ्या होणार आहेत.
दानापूर ही गाडी पुणे स्थानकात २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी दुपारी ४.१५ वाजता सुटून मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजता पोहचेल. तर दानापूर स्थानकातून २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सुटून दुसºया दिवशी दुपारी ३.४० वाजता पुण्यात पोहचेल.
या गाडीला अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, सटाना माणिकपूर, अलाहाबाद जंक्शन, मिर्झापूर, पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन बक्सर व अरा या स्थानकांवर थांबेल.
.............................
पुणे ते बल्लारशाह ही गाडी २५ ऑक्टोबर रोजी रात्री २३.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० वाजता बल्लारशाह स्थानकात पोहचेल. तर २६ ऑक्टोबर रोजी या स्थानकातून पुण्याकडून रवाना होईल.
गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता सुटून पुणे स्थानकात दाखल होईल. या गाडीला अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा,
वरोरा व चंद्रपूर हे थांबे असतील. या गाड्यांसाठीची आरक्षणाची सुविधा दि. १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.