बारामतीत लक्ष्मीच्या पाऊलांनी अवतरल्या तिळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:38+5:302021-08-01T04:10:38+5:30

बारामती: आई होणं हे कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. बारामती येथील एका दांपत्याला १६ वर्षांनंतर अपत्यप्राप्तीचा ...

Sesame seeds in Lakshmi's footsteps in Baramati | बारामतीत लक्ष्मीच्या पाऊलांनी अवतरल्या तिळ्या

बारामतीत लक्ष्मीच्या पाऊलांनी अवतरल्या तिळ्या

Next

बारामती: आई होणं हे कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. बारामती येथील एका दांपत्याला १६ वर्षांनंतर अपत्यप्राप्तीचा आनंद मिळाला आहे. शुक्रवारी (दि. ३०) वैद्यकिय तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीच्या पाऊलांनी या दांपत्याच्या घरात तिळ्या अवतरल्या आहेत. या महिलेची आणि तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. राजेश कोकोरे यांनी सांगितले.

डॉ. राजेश कोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील एक दांपत्यला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्यप्राप्तीसाठी वैद्यकिय उपचार त्यांच्यावर सुरू होते. अशातच टेस्ट्युब बेबी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरले. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये महिलेल्या गर्भाशयाच तीन गर्भ रूजल्याचे लक्षात आले. महिलेचे वय पाहता डॉ. कोकोरे यांनी त्यांना गर्भपाताचा सल्ला दिला होता. मात्र इतक्या वर्षांनंतर आपल्या गर्भात आपले एक नाही तर तीन-तीन बाळं वाढत असल्याने या महिलेला व पतीलाही आपल्या होणाऱ्या बाळांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली होती.या दाम्पत्याने या तिन्ही बाळांना जन्म देण्याचे ठरवले. त्यानंतर याेग्य उपचार सुरु झाले. नववा महिना सुरू झाल्यानंतर हा काळ जास्त काळजीचा होता. कोणताही धोका नको म्हणून डॉ. कोकरे यांनी आठवडाभर आधीच या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेतले. रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण याची वेळोवेळी तपासणी केली जात होती. या आधी देखील डॉ. राजेश कोकरे यांनी अनेक प्रसुती केल्या आहेत. त्यांच्या रूग्णालयात जुळी मुले, अवघडातल्या बाळंतीणीच्या प्रसुती देखील सहजतेने पार पडल्या आहेत. मात्र यावेळी तीळी मुलं असल्याने त्यांच्या समोर देखील आव्हान होते.

----------------------------

महिलेचे वय पाहता नैसर्गिक प्रसुती करणे धोक्याचे होते. म्हणून आम्ही सिझरचा पर्याय निवडला. त्यासाठी तयारी देखील केली. महिलेच्या सर्व तपासण्या योग्य आल्याचे पाहून मी व माझा स्टाफ, भूलतज्ज्ञ डॉ. आनंद वणवे आम्ही सर्वांनी सिझरला सुरूवात केली. अनेक वर्षांच्या सरावामुळे पहिल्या बाळाला आम्ही सुरक्षित बाहेर काढले. यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या बाळाचा जन्म झाला. तिनही मुली होत्या. जणू लक्ष्मी, पार्वती, सरस्वती जन्माला आल्यासारखे वाटले. सध्या महिला व तीनही मुलींची प्रकृती उत्तम आहे. दोन मुलींचे वजन १.९ किलो, तर एका मुलीचे वजन १.७ किलो आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. वरद देवकाते या बाळांची सध्या काळजी घेत आहेत.

- डॉ. राजेश कोकरे.

महिला आरोग्य तज्ज्ञ, बारामती

Web Title: Sesame seeds in Lakshmi's footsteps in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.