मंगळसूत्र हिसकाविण्याचे सत्र सुरूच
By admin | Published: May 18, 2014 11:45 PM2014-05-18T23:45:43+5:302014-05-18T23:45:43+5:30
मंगळसूत्र हिसकाविण्याचे २ प्रकार वानवडी आणि येरवडा भागात शनिवारी सायंकाळनंतर झाले असून, चोरांनी सव्वा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
पुणे : मंगळसूत्र हिसकाविण्याचे २ प्रकार वानवडी आणि येरवडा भागात शनिवारी सायंकाळनंतर झाले असून, चोरांनी सव्वा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. अनिता श्याम कांबळे (वय ५१, रा़ ओम तुलसी अपार्टमेंट, म्हसोबा मंदिराजवळ, वानवडी) या नोकरदार महिला सायंकाळी सहानंतर पायी घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने ४० ग्रॅमचे, ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून पळविले. हा प्रकार वानवडीतील तात्या टोपे सोसायटीच्या कोपर्यावर झाला. भावना भास्कर ढवळे (वय ५३ वडगाव शेरी) या रात्री सव्वाआठच्या सुमारास लग्न सोहळ्यातून घरी परतत असताना सैनिकवाडीतून जात होत्या. महाराष्टÑ बँकेजवळ अंधारात दबा धरून बसलेल्या चोराने मागून येऊन त्यांचे ३२ ग्रॅम वजनाचे, ४५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. येरवडा आणि वानवडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)