सहकार मोडणा-यांना घरी बसवा

By admin | Published: October 11, 2014 06:58 AM2014-10-11T06:58:04+5:302014-10-11T06:58:04+5:30

सहकार मोडीत काढणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवा,’’

Settle the collapses in the house | सहकार मोडणा-यांना घरी बसवा

सहकार मोडणा-यांना घरी बसवा

Next

मांडवगण फराटा : ‘‘सहकार मोडीत काढणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवा,’’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. ते मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शिरूर-हवेलीचे भाजपाचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते .
सभेच्या अध्यक्षस्थानी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब फराटे-पाटील होते.
या वेळी माजी आमदार बाबूराव पाचर्णे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, घोडगंगाचे माजी संचालक आत्माराम फराटे, सरपंच लतिकाताई जगताप, गणपतराव फराटे यांचीही भाषणे झाली. या वेळी घोडगंगाचे माजी संचालक भानुदासभाऊ फराटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक श्यामराव चकोर, उपसरपंच महादेव फराटे, गोविंद फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ शितोळे, शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, भानुदास शिंदे, शंकरराव फराटे, फत्तेसिंग वाबळे, पांडुरंग फराटे, विश्वासकाका फराटे, प्रकाश जगताप, सुनील साळुंके, अमोलदादा जगताप, बिभीषन फराटे, सचिन शितोळे, आप्पासाहेब फराटे, उमेश फराटे, उत्तम फराटे, नवनाथ गायकवाड, संतोष नागवडे आदी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर बाबूराव पाचर्णे यांनी गावातील बाजारपेठेतून पदफेरी काढली. (वार्ताहर)

Web Title: Settle the collapses in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.