पठारवाडीत विद्यार्थ्यांकरीता सेतू अभ्यासमाला सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:32+5:302021-07-02T04:08:32+5:30
सेतू अभ्यासक्रम १ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत ४५ दिवसांचा हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन असा दोन्ही प्रकारे राबविला जाणार ...
सेतू अभ्यासक्रम १ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत ४५ दिवसांचा हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन असा दोन्ही प्रकारे राबविला जाणार आहे. या अभ्यासक्रमात विषयनिहाय व दिवसनिहाय कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून शिक्षक, पालक, स्वयंसेवक, सहकारी मित्र व सहाध्यायी यांच्या मदतीने त्या विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत. यामध्ये गाणी, गोष्टी, गप्पा, संभाषण, वाचन, लेखन व चाचण्या घेण्यात येणार आहेत.
सेतू अभ्यासक्रम www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
चाकण जवळील पठारवाडी शाळेतील अनेक विद्यार्थी हे आदिवासी कातकरी समाजातील असल्याने विद्यार्थ्यांजवळ ऑनलाईन पद्धतीने अध्ययन करण्यास मोबाईल नाही . त्यामुळे मुख्याध्यापक मनोहर मोहरे व शिक्षक किरण शिंगडे यांनी कृतिपत्रिकांची छपाई करून त्या विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन वाटप केल्या. तसेच त्याबाबत मार्गदर्शनही केले.
पठारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सेतू अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे.सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादनामध्ये त्रुटी राहू नये, तसेच विद्यार्थ्यांची मागील अध्ययनाची उजळणी व्हावी व नवीन अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करण्यात येणार आहे.
मनोहर मोहरे, मुख्याध्यापक.
०१ चाकण
पठारवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचा सेतू अभ्यासक्रम सुरू.