सात एकर ऊस खाक
By Admin | Published: August 31, 2015 03:46 AM2015-08-31T03:46:18+5:302015-08-31T03:46:18+5:30
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मेन लाईनच्या तारा तुटून सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीमध्ये मांडवगण फराटा
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मेन लाईनच्या तारा तुटून सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीमध्ये मांडवगण फराटा येथील शेतकरी लक्ष्मण किसनराव दरेकर, काशिनाथ किसनराव दरेकर, सुभाष उद्धव दरेकर यांचा प्रत्येकी २ एकर याप्रमाणे एकूण सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शेतामध्ये महावितरण कंपनीने उभे केलेले खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने दोन खांबांमधील तारा लोंबकळल्यामुळे हवेच्या प्रवाहाने या तारा एकमेकींना घर्षण होऊन मोठ्या प्रमाणावर ज्वाला उसाच्या शेतात पडल्याने ऊस जळण्याचे प्रमाण वाढले आहे. लवकरात लवकर या तारा ओढून घ्याव्यात, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
अगोदरच उसाच्या बाजारभावाची शासन हमी देत नाही. त्यात आलेले पीक डोळ््यासमोर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महावितरण कपंनीने उसाची भरपाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जळालेल्या उसाचा पंचनामा महावितरण व महसूल विभागाने घटनास्थळी येऊन केला आहे.