महायुतीचे उमेदवार आढळराव-पाटलांच्या संपत्तीत साडेसात कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:20 AM2024-04-26T11:20:38+5:302024-04-26T11:21:35+5:30
आढळराव यांच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जही आहे...
पुणे :शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याकडे २७ कोटी १४ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९च्या निवडणुकीत त्यांच्याकडे १९ कोटी ७९ लाख रुपयांची संपत्ती होती.
त्यामुळे गेल्या पाच वर्षांत त्यांच्याकडील संपत्तीत सुमारे साडेसात कोटींची वाढ झाली आहे. आढळराव यांच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जही आहे. आढळराव-पाटील यांच्या पत्नीकडे ११ कोटी ४९ लाख रुपयांची संपत्ती आहे तसेच त्यांच्यावर १ कोटी ८० लाख रुपयांची कर्ज आहे.
आढळराव यांच्याकडील संपत्ती
रोख रक्कम : ६,४०,६९३
बँक डिपॉझिट : १,०३,६९,६१६
शेअर्स गुंतवणूक : ६,६८,४३५
कार : २०,०००
स्थावर मालमत्ता : ७ कोटी ४९ लाख
जंगम मालमत्ता : ११ कोटी १९ लाख
कर्ज : १ कोटी ५१ लाख