साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:11+5:302021-05-13T04:10:11+5:30
या लसीकरण मोहिमेसाठी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. त्यात डॉ. प्राची क्षीरसागर, डॉ. राम देवखिळे, ...
या लसीकरण मोहिमेसाठी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. त्यात डॉ. प्राची क्षीरसागर, डॉ. राम देवखिळे, शिल्पा किराडे, संजय फराटे, रवींद्र तांदळे, आशा सुर्वे, आरोग्यसेविका रोहिणी सोनटक्के, मीरा इंगळे, राधिका नरगिडे या सर्व लसीकरण प्रक्रियेत सहभागी आहेत. आजतागायत ६ हजार ४५६ लाभार्थींना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, १ हजार १९२ लाभार्थींनी कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला असल्याची माहिती डॉ. स्नेहल घोडेराव यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत रांजणगाव गणपती, खंडाळे, पिंपरी दुमाला, गणेगाव, वाघाळे, सोनेसांगवी, ढोकसांगवी, दहिवडी, करंजावणे, भांबर्डे या गावच्या लाभार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
सध्या शासनाकडून लसीचा पुरवठा कमी येत असल्याने पुढील शासन आदेश येईपर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त दुसऱ्या डोसच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असून सध्या तरी पुढील आदेश येईपर्यंत इतर वयोगटातील लाभार्थ्यांनी लसीकरण करण्यासाठी येऊ नये असे डॉ.महेश सातव व ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांनी सांगितले.
१२ रांजणगाव गणपती
रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते.